*उमराणी बु !! येथे जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात साजरा*
*उमराणी बु !! येथे जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात साजरा*
धडगाव - मौजे उमराणी या गावातील आदिवासी युवा एकता परिषद शाखा तसेच आदिवासी नवनिर्माण सेना गृप यांच्या संयुक्त विद्यामानाने संयुक्त राष्ट्र संघ यांच्या मान्यताप्राप्त जगभर जल, जंगल, जमीन यांच्या साधीन्यात राहून वास्तल्य करणाऱ्या आदिवासी म्हणजेच मुळनिवासी म्हणुन जगभर आपली कला-संस्कृती, भाषा, चालीरीती, वेशभुषा यांची जोपासना करणारा हा आदिवासी समाज असुन आज जगभर कोविड-१९ ( कोरोना ) महामारीचे गांभिर्य लक्षात घेता संयुक्त राष्ट्र संघ घोषित मुळनिवासी आदिवासीचा सण ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस मोठया उत्साहात साजरा करत येत असुन करोना महामारी मुळे यंदा वर्षी आपला कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करणे शक्य नव्हते म्हणुन सामाजिक बांधलकी आणि सामाजिक अंतर ठेवुन यंदाच्या कार्यक्रम आदिवासी क्रांतीवीर आणि आई कुलदेवी यांच्या प्रतिमा पुजन करून वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.... कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणुन पंचायत समिती सदस्य श्रीमती.शोभाबाई पावरा आणि प्रमुख पाहुणे म्हणुन शारदाई फॉउन्डेशनचे सचिव श्रीमती. शारदाबाई एल.पावरा, पो.पाटील तानाजी एफ. पावरा, मा. सरपंच वंतीलाल एफ. पावरा, नेरब्या पावरा, शारदाई फॉउन्डेशनचे अध्यक्ष जगदीश एल.पावरा, गावातील जेष्ठ नागरिक, मा. ग्रा.पं. सदस्य अनिल जुहऱ्या पावरा उपस्थित होते...... यावेळी सर्व नागरिकानी यंदा ग्रामपंचायत कार्यालयाजवळ सोशल डिस्टेटींग ठेवून कार्यक्रमाच्या सुरवातीला आदिवासी क्रांतीकारक, भगवान बिरसा मुंडा, तंट्या भिल,वीर खाज्या नाईक तसेच भारतरत्न व घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर व आदिवासी समाजाची कुलदैवत याहा मोगी यांच्या प्रतिमेचे पूजन व श्रीफळ अर्पण करण्यात आले... यावेळी कार्यक्रमाचे महत्व व जागतिक आदिवासी दिवस का साजरा करावा? याचे महत्व आदिवासी युवा एकता परिषद उमराणी बु !!चे उपाध्यक्ष चेतन पावरा यांनी प्रास्ताविक व मनोगत व्यक्त केले.... तसेच मा.ग्रा.सदस्य अनिल पावरा यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हटले कि आपला आदिवासी समाज हा निसर्गपुजक असुन आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या उद्दिष्टे पूर्ण व्हावे या उद्देशाने वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन उर्वरित झाड प्रत्येक ग्रामस्थानी आपआपल्या शेताच्या बांधावर, अंगणात लावून जोपासना करावी असे म्हटले..... कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास बी. पावरा यांनी केले आभार अनिल जे.पावरा यांनी मानले.... त्यानंतर वृक्षारोपण ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवरात व स्मशानभूमी येथे ग्रामस्थ युवा तरुणांनी वृक्षारोपण लावून अनोख्या पद्धतीने 9 आगस्ट जागतिक दिवस म्हणून साजरा करण्यात आला....... कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.बटेसिंग पावरा, प्रकाश एस.पावरा (शिक्षक), वसंत पराडके (शिक्षक), श्री.आपसिंग एफ.पावरा, संतोष पावरा, राजेंद्र ए.पावरा, इंजि.विशाल पावरा, राजु साळवे, अमर पावरा, जयवंत पावरा, कैलास सी.पावरा, डेकल्या पावरा, सुरेश पावरा, हेमंत के.पावरा, संजय पावरा, किसन पावरा, दिलीप एम.पावरा, दिनेश पावरा, राहुल एम.पावरा, प्रभात पावरा, बुकळ्या पावरा, बारक्या पावरा, अशोक पावरा, प्रकाश जि.पावरा, चि.रोहित, चि.मोहित यांच्या सहकार्याने वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला..... यावेळी अनमोल सहकार्य ग्रा.प.उमराणी बु., आदिवासी एकता युवा परिषद उमराणी बु, आदिवासी नवनिर्माण सेना गृप उमराणी बु... तसेच सर्व जेष्ठ ग्रामस्थ युवा मित्र यांचे सहकार्य लाभले......