आदिवासी सातपुडा शिक्षणाचे जनक समाज सुधारक ,स्वतंत्र सेनानी महाराज कै.जनार्दन पोहऱ्या वळवी बाबा यांच्या स्मृतीदिन निमित्त विनम्र अभिवादन
*आदिवासी सातपुडा खुशितील शिक्षणाचे जनक माजी.आमदार आदरणीय महाराज कै.जनार्दन पोहऱ्या वळवी बाबा १६ ऑगस्ट २०१२ यांच्या स्नुतिदिन निमित्त विनम्र अभिवादन💐💐🙏*
*कै.जनार्दन बाबा यांचा जन्म १६/०१/ १९२४ रोजी मुंडलवड येथे झाला बाबा यांची आर्थिक परिस्थिती फार बिकट होती अश्या परिस्थितीत त्यांनी त्याकाळी शिक्षण घेतले.शिक्षण घेत असताना त्यांनी आदिवासी समाजावर होणारे अन्याय, आदिवासींचे दारिद्य्र पाहून त्यांनी स्वतःच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करून भारत स्वतंत्र चलवळीत त्यांनी भाग घेतला १८४२ साली स्वतंत्रलढ्यात चालत असलेल्या आंदोलनात बाबांचे नेतृत्व सुध्दा होते त्यांनी सुध्दा इग्रजांच्या लाठ्या खाल्या बाबा स्वतंत्र सेनानी असून एक समाज सुधारक सुध्दा होते त्यांनी नोकरीची आष्या न करता आदिवासी समाजाला योग्य ती दिशा देण्यासाठी समाज सुधारण्यासाठी चळवळीत पुढे आले.*
*कै.जनार्दन बाबा यांनी सातपुड्यातील गोर गरीब समाज जनतेच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी दळपळ त्यांची होती बाबांनी दऱ्या खोऱ्यातील आदिवासी मुलगा शिकवा ,पुढे होवून मोठा अधिकारी व्हा असे त्यांचे स्वप्न होते त्यांनी आपला आदिवासी समाज शिक्षणापासून वंचित राहणार नाही,यासाठी शिक्षणाची चळवळ सातपुड्याच्या खुशीत केली.बाबांचा प्रवास हा जास्तीत जास्त दऱ्या खोऱ्यात पायपीठ करून होता इ.स१९५५ सालापासून शासकीय आश्रम शाळा सुरू करण्याचा प्रवास सुरू केले शेकडो आश्रम शाळा सातपुड्याच्या खुशीत काढल्या .तेसेच इ.स.१९६३ साली आदिवासी सातपुडा शिक्षण प्रसारण मंडळ स्थापन केले.*
*बाबा यांनी अक्राणी तालुका स्तरावर माध्यमिक,उच्च माध्यमिक कॉलेज स्थापन केले. बाबांच्या शिक्षणाचा प्रवाह सुरू केला आज लाखो सातपुड्यातील गोर गरिबांचे मुलं शिक्षणाच्या प्रवाहात मोफत शिक्षण घेत आहे.*
*आज अक्राणी तालुक्यातील गावांमधील दऱ्या खोऱ्यातील गोर गरीबांची मुलं कै.जनार्दन पोहऱ्या वळवी बाबामुळे शिक्षण घेवून,पुढील शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातीन शहरी भागात पुढील शिक्षण घेत आहेत.बाबांच्या या शिक्षणाच्या तळमळीतून मोठ मोठे अधिकारी , डॉक्टर , वकील , इंजिनियर ,अनेक उच्च पदावर नौकरी करीत आहे.बाबा यांनी शेवटच्या श्वास पर्यंत समाज सुधारण्याचे प्रयत्न केले आज अक्राणी तालुक्याचा गरीब मुलगा पुढील उच्चपदी शिक्षण,अनेक शहरात परदेशात सुध्दा घेत आहे.*
*सातपुड्यातील गोर गरीबांचे समाज सुधारक सातपुढ्यातील शिक्षणाचे जनक महाराज कै.जनार्दन पोहऱ्या वळवी बाबा यांच्या स्मृतीदिन निमित्त विनम्र अभिवादन💐💐💐🙏🙏🙏*
