जि.प.शाळा उमराणी बु काल्लेखेतपाडा शाळेची जागतिक पातळीवर ग्लोबल भरारी

✒📚जि.प शाळा, उमराणी बु (काल्लेखेतपाडा) ता: धडगांव, जि: नंदुरबार* या शाळेची निवड जगातील १०० शाळामध्ये ग्लोबल शोकेससाठी या निवड  झाली होती #WorldEducationWeekया  जागतिक पातळीवरील कार्यक्रम *Microsoft Terms* या एँपच्या माध्यमातुन  दिनांक : ८ ऑक्टोबर, २०२०वेळ : संध्याकाळी ठीक 6: 30 ते 7:३० या दरम्याने शाळेची लाईव जागतिक पातळीवर सुरु होते त्यात शाळेचे  शिक्षक विद्यार्थी व पालक यांनी सुध्दा आपला सहभाग नोंदवला त्यात अनेकांनी या शाळेची लाईव पाहिली असेन या जागतिक पातळीवर आदिवासी डोंगराळ भागातील विद्यार्थांचे शिक्षण कश्या पध्दतीने असते व शिक्षक विद्यार्थांना कश्या पध्दतीने शिकवितात व विद्यार्थी सुध्दा शिक्षणाचो महत्व समजुन शिक्षणाचे ध्येर्य चिकाटीपणा या गोष्टीचे महत्व या जागतिक पातळीवर दाखविले तसेच जि.प.शाळेचे शिक्षक यांनी विद्यार्थांना ज्या पध्दतीने तळमणीने शिकवितात तसेच विद्यार्थाबद्दल जि आपले पणाची भावना या शिक्षकांनी दाखविली तसेच शिक्षणाचे आठ वर्ष कालावधिचे मुल्यमापन या शाळेचे केले गेले शिक्षकांनी आदिवासी भागातील विद्यार्थाचे शिक्षण, पालकाचे विद्यार्थासाठी शिक्षणाची दळपळ ,विद्यार्थांच्या शैक्षणिक व आर्थिक समस्या सामाजिक एकता ,रुढी-परंपरा, या विषयी माहिती दिली तसेच या आदिवासी भागातील  विद्यार्थी देशासाठी काहीतरी करतील हे विद्यार्थाबद्दल असलेले पाहिलेले स्वप्न विचारशैली जगासमोर मांडले खरोखर सांगण्याचे तात्पर्य एकच कि नंदुरबार जिल्हातील भाग धडगांव तालुका अतिदुर्गम भागात गणला जातो त्यात विद्यार्थांच्या शिक्षणाच्या बाबतित अनेक समस्या येतात काही असे गावे आहेत ज्या ठिकाणी दळणवळणाची सोय नाही अश्या ठिकाणचे विद्यार्थी सुध्दा शिक्षणासाठी तळमळ करीत असतात   त्या ठिकाणी सिध्दा शिक्षण पेहचले आहेत शिकवण्याचे ध्येर्य व विद्यार्थां बद्दल आपले पणाची भावना या आदिवासी डोंगराळ भागात दाखवली जाते तर पालकांनीही शिक्षणाचे महत्व समजुन घेतले आपल्या  भागात एक चांगले शिक्षण घेवु शकणार हेच कार्य जि.प.शाळा काल्लेखेत पाड्यातील संपुर्ण शिक्षकांनी करुन दाखविले मागिल आठे ते दहा वर्षा पुर्वीच्या काळात या शाळेची पटसंख्या १५ होती पण आजच्या काळात या शाळेची पटसंख्या १४०आहे याचे कारण काय तर शिक्षकांची शिकवण्याची कला व विद्यार्थाबद्दल आपले पणाचा भावना ज्यांनी विद्यार्थाबद्दल पालकत्व निभवले सर्व शिक्षक वर्ग यांनी विद्यार्थांच्या शिक्षणाच्या बाबतीत येणा-या समस्या विद्यार्थांच्या आर्थिक परिस्थिती बद्दल जाणुन घेतले तसेच विद्यार्थी सुध्दा शिक्षणाचे महत्व समजुन शिक्षण घेत आहेत व आपला आत्मविश्वास वाढवित आहे आज शाळेने भारताचे प्रतिनिधीत्व या जगासमोर जागतिक पातळीवर मांडले .
  📚🌹🌹🌹🖊️🙏🖊️🌹🌹🌹📚

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी सातपुडा शिक्षणाचे जनक समाज सुधारक ,स्वतंत्र सेनानी महाराज कै.जनार्दन पोहऱ्या वळवी बाबा यांच्या स्मृतीदिन निमित्त विनम्र अभिवादन